भूमी मंदिराच्या अखत्यारीत असतांनाही कानिफनाथांची मूर्ती हटवण्याची धर्मांधांची मागणी !
गुहा (अहिल्यानगर) येथील मुसलमान समाजाचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
गुहा (अहिल्यानगर) – येथील श्री कानिफनाथ महाराज मंदिराची जागा वक्फ बोर्डाद्वारे बळकावण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. त्यांनी येथील हिंदु पुजारी आणि वारकरी यांना मारहाणही केली होती. या प्रकरणी २१ नोव्हेंबर या दिवशी समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी या ठिकाणी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी श्री कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. या घटनेच्या निषेधार्थ गुहा येथील मुसलमान समाजाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर २९ डिसेंबरपासून साखळी धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.
१. २८ डिसेंबरला सकाळी ९ वाजता कानिफनाथ देवस्थानच्या जागेवर कानिफनाथांची मूर्ती ठेवण्यात आल्याचे निर्दशनास आले होते. या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने हे कृत्य अवैध असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
२. श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी पाटील, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या समक्ष मूर्ती ठेवल्याचा आरोप केला आहे.
३. ‘वादग्रस्त ठिकाणी ठेवलेली कानिफनाथ महाराज मूर्ती, दानपेटी, ध्वनीक्षेपक काढावी. जोपर्यंत मूर्ती काढण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू’, अशी धमकी मुसलमानांनी दिली आहे. या वेळी गुहा येथील शौकत तांबोळी, जुनेद शेख, राजू शेख, समीर शेख, इस्माईल शेख, कासम शेख आदींसह मुसलमान समाजाचे नागरिक उपस्थित होते.
गुहा येथे कानिफनाथ मंदिर असल्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत ! – हरि आंबेकर, विश्वस्त, श्री कानिफनाथ महाराज मंदिरश्री कानिफनाथ महाराजांनी मौजे गुहा, ता. राहुरी, जिल्हा नगर या गावी आले. त्यांनी या गावात, ध्यान, ज्ञान, वैराग्य या तिन्ही प्रकारच्या साधना करून गुहा ग्रामस्थांना हिंदु संस्कृतीची शिकवण दिली. त्यांनी मौजे गुहा गावाच्या पंचक्रोशीत ध्यानमंदिर, ज्ञानमंदिर आणि वैराग्य मंदिर यांची स्थापना केली होती. ध्यानमंदिरातून आपल्या अलौकिक शक्तीने गुप्त भ्रमण करण्यासाठी भुयारी मार्गही सिद्ध केला होता. तो अजूनही आहे. त्याचे अवशेषही आहेत; म्हणून या भुयारी मार्गामुळे ‘मौजे गुहा’ गावास ‘गुहा’ हे नाव पडले. याविषयीची ही हिंदु धर्मातील धर्मग्रंथ ‘श्री नवनाथ भक्तीसार’ या ग्रंथात नमूद केलेली आहे. हा महत्त्वाचा पुरावा आहे. या मंदिराची पुणे पुरालेखागार येथे पुरातन मोडी भाषेतील सनद आहे. ही सनद १३ फेब्रुवारी १८५४ या दिवशीची असून शंकर वा. बावाजी यांच्या सांगण्याप्रमाणे हे मंदिर श्री कानिफनाथ महाराजांचे हिंदु धर्मस्थळ आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय किंवा सिटी सर्वे येथे दर्ग्याची कुठलीही नोंद नाही. असे असतांना मुसलमान समाज दर्गा बांधण्याचा प्रयत्न करत आहे. कानिफनाथ देवस्थानच्या नावाने महसूल विभागात नोंद आहे. |
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमान आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहेत, याचे हे उदाहरण ! वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याविना पर्याय नाही. सरकारने या प्रकरणाची त्वरित नोंद घेऊन कानिफनाथांचे भक्त आणि हिंदू यांना आश्वस्त करावे ! |