France Illegal Immigrants : जानेवारी महिन्यापासून फ्रान्स ३० सहस्र अवैध स्थलांतरितांना बाहेर काढणार !
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्स सरकार जानेवारी २०२४ पासून त्याच्या देशातून अवैधरित्या आलेल्या स्थलांतरितांना बाहेर काढणार आहे. ‘फ्रान्समध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत होणार्या ऑलिम्पिकपूर्वी देशात शांततेचे वातावरण निर्माण करणे’, हा यामागचा हेतू आहे. फ्रान्समध्ये ३० सहस्र अवैध स्थलांतरित आहेत. त्यांची सूची सरकारकडून बनवण्यात आली आहे. यापूर्वी ब्रिटन आणि अन्य युरोपीय देश यांनी अशी कारवाई चालू केली आहे.
संपादकीय भूमिका‘फ्रान्स करू शकतो, तर भारत का नाही ?’ असा प्रश्न भारतियांच्या मनात उपस्थित होणारच ! |