Lakhbir Singh Landa : भारताकडून कॅनडास्थित कुख्यात गुंड लखबीर सिंह लांडा ‘आतंकवादी’ घोषित !
नवी देहली – भारत सरकारने कुख्यात गुंड लखमीर सिंह लांडा याला ‘आतंकवादी’ घोषित केले आहे. पंजाबच्या मोहाली येथील पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या आक्रमणावरून ही कारवाई करण्यात आली. लांडा सध्या कॅनडात असून तेथून तो भारताविरुद्ध कारवाया करत आहे. तो ‘बब्बर खालसा’ या प्रतिबंधित खलिस्तानी आतंकवादी संघटनेशी संबंधित आहे. राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (‘एन्.आय.ए.’ने) त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंदवले आहेत. भारत सरकार आता त्याला कॅनडातून प्रत्यार्पण करून भारतात आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
Canada-based Babbar Khalsa’s Lakhbir Singh Landa declared a terrorist by Ministry of Home Affairs. pic.twitter.com/iz2eNhpxyt
— ANI (@ANI) December 30, 2023
लांडा याच्यावर त्याने पंजाबमध्ये आतंकवादी कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रे आणि स्फोटके पुरवल्याचा आरोप आहे. यासह खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी आदी गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग आहे.
संपादकीय भूमिकाकॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे ! |