Srilanka Indian Origin Tamils : श्रीलंकेच्या विकासात भारतीय तमिळी नागरिकांनी दिलेल्या योगदानासाठी लवकरच टपाल तिकिटाचे प्रकाशन !
नवी देहली – श्रीलंकेच्या विकासात भारतीय वंशाच्या तमिळी नागरिकांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते लवकरच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
At BJP HQ today, released a stamp commemorating 200 years of Indian-origin Tamils in Sri Lanka.
This is truly a historic occasion when we remember the extreme hardships endured by the people belonging to Madras Presidency who were taken to erstwhile Ceylon by the British and… pic.twitter.com/e7WpBucejL— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 30, 2023
याविषयी माहिती देतांना तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई म्हणाले, ‘‘श्रीलंकेत भारतीय वंशाच्या तमिळींच्या आगमनाच्या २०० वर्षांनंतर टपाल तिकीट प्रसिद्ध करणे, हे त्यांच्या मेहनतीची नोंद घेण्यासारखे आहे. इंग्रजांनी तमिळींना श्रीलंकेत पाठवले होते. श्रीलंकेच्या पूर्व प्रांताचे गव्हर्नर सेंथिल थोंडामन हे टपाल तिकीट स्वीकारतील. भाजपच्या मुख्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. वर्ष २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळींचे कल्याण आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेऊन अनेक गोष्टी केल्या आहेत.’’