Casino In Jatrotsav : इब्रामपूर (गोवा) येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवातील जुगाराला विरोध करणार्यांची नावे मंदिर समितीने फलकावर लावली !
स्थानिकांकडून तीव्र नाराजी
पणजी : पेडणे आणि सत्तरी तालुक्यांतील गावांतील मंदिरांच्या जत्रोत्सवांत पत्त्यांचा जुगार चालतो. याला स्थानिक भक्तांसह अनेक हिंदूंचा विरोध असून हा जुगार बंद व्हावा, यासाठी प्रयत्नही केले जातात. इब्रामपूरमधील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवात चालणार्या जुगारालाही तेथील काही भक्तांनी विरोध केला आहे. यावरून या मंदिराच्या व्यवस्थापन समितीने विरोध करणार्यांची नावे देवळातील फलकावर लावली आहेत. समितीच्या या कृत्याला अनेकांनी विरोध दर्शवला आहे.
जत्रोत्सवातील जुगाराला १५ जणांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी पोलीस महासंचालकांसह मोपा पोलीस ठाणे, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, तसेच गुन्हे अन्वेषण विभाग यांनाही लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लोक जत्रोत्सवात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात; परंतु जुगारामुळे लोकांना त्रास होत असल्यामुळे लोक लवकर निघून जातात. त्यामुळे श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवातील अवैध जुगाराला आमचा तीव्र विरोध आहे. महाजन आणि इब्रामपूर ग्रामस्थ यांनी याकडे लक्ष देऊन जुगाराला थारा देऊ नये. जत्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्न व्हावे. यावर पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. (ग्रामस्थांनी संघटितपणे हा जुगार रोखला पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|