अखंड ईश्वरी अनुसंधानात असणारे पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) !

पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांच्याकडे आम्ही दोघे (श्री. अशोक सारंगधर आणि सौ. जयश्री सारंगधर) भेटायला गेलो होतो. त्या वेळी मला (सौ. जयश्री सारंगधर) देवाच्या कृपेने जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. जयश्री सारंगधर

१. ‘पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी पू. तिवारी यांना काहीतरी विचारल्यावर ते एक दोन शब्दच बोलले. त्या वेळी ‘ते अखंड अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले.

२. पू. काकांची त्वचा गुलाबी आणि अंगकांती सतेज वाटली. त्यांच्या हाताची त्वचा मला तळहाताच्या त्वचेपेक्षा अधिक मऊ जाणवली.

३. पू. काका मध्येच ‘माँ’, असे म्हणायचे. तेव्हा ‘ते देवीशी बोलत आहेत’, असे मला जाणवले.

४. पू. काका काही वेळा ‘परमहंस’, असे म्हणायचे. तेव्हा ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला वाटले.

५. आधुनिक वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी हिने साधनेसंदर्भात पू. काकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘साधकांनी साधनेसाठी परिश्रम घ्यायला हवेत.’’

६. पू. तिवारीकाका एक दोन वाक्येच बोलायचे; पण त्यातून ते ‘साधनेसाठी शक्तीच देत आहेत’, असे मला जाणवत होते. त्यांच्या बोलण्यामुळे माझी भावजागृती झाली.

गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) संतांच्या माध्यमातून आपल्याला साधनेसाठी ऊर्जा देत आहेत. ‘आमची साधना व्हावी’, ही तळमळ आमच्यापेक्षा गुरुदेवांनाच अधिक आहे. ‘गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच ही सूत्रे माझ्या लक्षात आली’, अशा गुरुमाऊलींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.  गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. जयश्री अशोक सारंगधर, फोंडा, गोवा. (९.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक