विठ्ठलवाडी (कल्याण) येथे ७ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त !
ठाणे, २९ डिसेंबर (वार्ता.) – विठ्ठलवाडी येथील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीत अनधिकृतरित्या गुटख्याचा साठा असल्याची आणि त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी कोळसेवाडी पोलिसांनी धाड घालून ७ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणातील ५ आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (राज्यात गुटखाबंदी असतांनाही गुटखा कसा निर्माण केला जातो किंवा येतो, याच्या मुळाशी जाऊन कारवाई का केली जात नाही ? – संपादक)