२ ते ८ जानेवारी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन !
सोलापूर – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन २ ते ८ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. येथील दमाणीनगर, ‘शुभम हॉल ग्राऊंड’ येथे प्रतिदिन दुपारी ३.३० ते रात्री ७.३० या वेळेत ही कथा होणार आहे, अशी माहिती श्री. मुकुंद भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी धनेश केकडे, बालकिशन बिहाणी, लक्ष्मीनारायण बाहेती, भगीरथ खंडेलवाल आदी उपस्थित होते.
या वेळी श्री. मुकुंद भट्टड म्हणाले, ‘‘प्रतिदिन सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. इच्छुकांनी साई सुपर मार्केटच्या कोणत्याही शाखेत ३१ डिसेंबरअखेर नावे नोंदवावीत. २ जानेवारीला दुपारी २ वाजता दमाणीनगर येथील श्री गणेश मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष असून ते श्रीकृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या या भावकथेचा लाभ सर्वांनी घ्यावा.’’