सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप केल्यामुळे श्रीमती उषा मोहे यांना झालेले लाभ !
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्याने नागिणीमुळे अंगावर आलेले फोड बरे होणे
‘१७.११.२०२२ या दिवशी माझ्या मानेपासून छातीपर्यंत मोठमोठे फोड आले होते. त्याला ‘नागीण’, असे म्हणतात. ते फोड दुखत नव्हते किंवा तेथे खाजही येत नव्हती. आधुनिक वैद्यांनी औषधे दिली होती. माझ्या सहसाधिकेने फोडांचे छायाचित्र काढून सद्गुरु गाडगीळकाकांना (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना) पाठवले. त्यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप २ घंटे करण्यास सांगितला. हा नामजप केल्यामुळे माझ्या शरिरावरील फोड वाळले आणि ५० टक्के बरे झाले. तेव्हा ‘ही भगवंताची कृपा आहे’, याची मला जाणीव झाली आणि माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. सद्गुरु गाडगीळकाकांच्या लेखात दिल्याप्रमाणे नामजप केल्याने रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण सर्वसाधारण होणे आणि नंतर ते न वाढणे
मला मधुमेहाचा त्रास आहे. मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु गाडगीळकाकांच्या लेखात दिल्याप्रमाणे ‘श्री दुर्गादेव्यै नमः। श्री हनुमते नमः।’, हा नामजप एक मास केला. त्यानंतर ‘माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसाधारण झाले. त्यानंतर ते वाढले नाही’, याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्रीमती उषा मोहे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आणि वय ८१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |