मदरशातील शिक्षिकेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मौलानाला अटक !
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
खांडवा (मध्यप्रदेश) – कर्नाटक पोलिसांनी खांडवा, मध्यप्रदेश येथून मौलाना मुफ्ती गुलाम जिलानी याला अटक केली आहे. त्याच्यावर २४ वर्षीय शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित शिक्षिका कर्नाटकची रहिवासी आहे. मौलाना पीडितेला नशेच्या गोळ्या देऊन तिच्यावर बलात्कार करत होता. या काळात त्याने तिला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले होते. पीडित शिक्षिकेने बेंगळुरूमधील एका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलीस आरोपी मौलानाचा शोध घेत होते.
मौलाना गुलाम जिलानी हा वर्ष २०२०-२१ मध्ये कर्नाटकातील हुब्बळ्ळी येथे गेला होता. तेथे मौलानाची पीडितेशी ओळख झाली होती. मौलानाने खांडव्यातील अहमदपूर येथील मदरशामध्ये मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी कर्नाटकातील पीडितेसह अन्य एक, अशा दोन शिक्षिकांना आणले होते. मौलानाने एका शिक्षिकेशी लग्न केले होते. नंतर त्यांच्यात भांडण झाल्याने मौलानाने पत्नीला कर्नाटकात सोडले होते. यानंतर त्याने पीडित शिक्षिकेला नशेच्या गोळ्या देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी कर्नाटक पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशी घटना समजा एखाद्या हिंदूंच्या मठात घडली असती, तर पुरोगामी, कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी यांनी हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले असते ! आता ते याविषयी काहीही बोलणार नाहीत, याची निश्चिती बाळगा ! |