मनमिळाऊ आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या ठाणे, महाराष्ट्र येथील सौ. माला मुंदडा (वय ७४ वर्षे) !

पू. (श्रीमती) सुशीला मोदी

१. मनमिळाऊ

‘सौ. माला माझी मोठी बहीण आहे. ती कुटुंबातील सर्वांची प्रेमाने विचारपूस करते. ती सर्वांशी मिळून मिसळून रहाते. ती व्यवहारातही प्रत्येकाशी मिसळून रहाते.

सौ. माला मुंदडा

२. व्यवस्थितपणा

ती सर्व वस्तू व्यवस्थित ठेवते. तिला कुठे जायचे असल्यास ती तिला लागणार्‍या सर्व लहान-सहान वस्तू स्वतः समवेत  घेते. ‘स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा तिचा विचार असतो.

३. साधना

ती नियमित साधना (पूजा, पाठ आणि व्रत) करते. कधी प्रतिकूल परिस्थिती आली, तरीही ती त्यात खंड पडू देत नाही. ती प्रासंगिक सेवेत सहभागी होते. तिला मी साधनेविषयी काही सूत्रे सांगितली, तर ती त्वरित स्वीकारून स्वतःमध्ये तसा पालट करते आणि कृतीत आणते.

४. तिला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास आहेत, तरीही ती ते सर्व स्वीकारून नेहमी प्रसन्न असते.

५. इतरांना साहाय्य करणे

मला कधी व्यावहारिक अडचण आल्यास ती मला योग्य सल्ला देते.

६. स्थिर

तिच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, तरीही ती हतबल न होता त्यातून मार्ग काढून स्थिर राहिली.’

– (पू.) श्रीमती सुशीला मोदी (वय ७२ वर्षे), जोधपूर, राजस्थान. (२१.९.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.