इस्लाम धर्मीय शबनम करत आहे अयोध्येपर्यंत पायी प्रवास !
मुंबई – शबनम ही इस्लाम धर्मीय मुलगी अयोध्येला रामललाच्या दर्शनासाठी २१ डिसेंबरपासून येथून पायी चालत निघाली आहे. सध्या ती मध्यप्रदेशपर्यंत पोचली आहे. तिने हातात भगवा ध्वजही घेतला आहे. रमन राज शर्मा आणि विनीत पांडे हे सहकारी तिच्यासमवेत आहेत. हे तिघे प्रतिदिन ३० कि.मी. चालत आहेत. एकूण १४०० कि.मी. अंतर ते चालणार आहेत. त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे. या तिघांच्याही खाण्या-पिण्याची आणि रहाण्याची व्यवस्था पोलीस करत आहेत. ती महाराष्ट्रातील संवेदनशील भागातून जात असतांना पोलिसांनी तिला साहाय्य केले. शबनमच्या मते, ‘‘राम सर्वांचा आहे. त्यासाठी हिंदु असणे आवश्यक नाही.’’