मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती
‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक २१) !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
२९ सप्टेंबर या दिवशीपासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. त्या अंतर्गत २२ डिसेंबर या दिवशी आपण ‘मुकामार/दुखापत (Bruise/Injury)’ आणि ‘मुरगळणे (Sprain)’ या आजारावर घ्यावयाची काळजी अन् त्यावर घ्यावयाची औषधे’, यांविषयी माहिती वाचली. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारांच्या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. यातील काही प्रमुख तक्रारींच्या उपचारांच्या संदर्भातील माहिती पुढे दिली आहे. कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे. |
१. मासिक पाळीच्या आधी असलेल्या तक्रारी
१ अ. फॉस्फोरम् ॲसिडम् (Phosphorum Acidum)
१ अ १. पोटदुखी, अंगावर पांढरे जाणे आणि मनाची स्थिती रडवेली असणे
१ अ २. हिरड्या, तसेच गाल यांना सूज येणे
१ अ ३. शरिरावर असणार्या व्रणांमधून (ulcers मधून) रक्तस्राव होणे
१ आ. कल्केरिया कार्बाेनिकम् (Calcarea Carbonicum)
१ आ १. चक्कर येणे
१ आ २. जीभेला आंबट चव येणे
१ आ ३. थुंकीतून थोडे रक्त पडणे
१ इ. नेट्रम् म्युरियाटिकम् (Natrum Muriaticum)
१ इ १. स्तनांमध्ये वेदना होणे
१ इ २. रक्तस्राव लवकर आणि पुष्कळ प्रमाणात होणे
१ ई. कोनियम मॅक्युलेटम् (Conium Maculatum) : स्तनांमध्ये वेदना होणे आणि रक्तस्राव अतिशय अल्प प्रमाणात होणे
१ उ. ग्रॅफायटीस (Graphites) : योनीमार्गामध्ये खाज सुटणे
१ ऊ. व्हेराट्रम् आल्बम् (Veratrum Album) : मासिक स्राव चालू होण्यापूर्वी मळमळ किंवा जुलाब होणे
१ ए. क्रियोसोटम् (Kreosotum) : मासिक स्राव चालू होण्याच्या काही दिवस अगोदर अस्वस्थ आणि चिडचिड होणे
१ ऐ. मॅग्नेशियम म्युरियाटिकम् (Magnesium Muriaticum) : मासिक स्राव चालू होण्याच्या एक दिवस आधी पुष्कळ चिडचिड होणे
१ ओ. सेपिया ऑफिसिनॅलिस (Sepia Officinalis) : मासिक स्राव चालू होण्यापूर्वी नैराश्य येणे
१ औ. लायकोपोडियम क्लॅव्हॅटम् (Lycopodium Clavatum) : मासिक स्राव चालू होण्यापूर्वी विषण्णता येऊन प्रत्येक गोष्टीला विरोध करणे
१ अं. कॉस्टिकम् (Causticum) : मासिक स्राव चालू होण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची नकारात्मक बाजू पहाणे
१ क. कॅमोमिल्ला (Chamomilla) : मासिक स्राव चालू होण्यापूर्वी विचित्रपणे वागणे
२. मासिक पाळीच्या पूर्वी आणि चालू असतांना असलेल्या तक्रारी
२ अ. ग्रॅफायटीस (Graphites) : कोरडा खोकला, तसेच घाम येणे
२ आ. लिथियम कार्बाेनिकम् (Lithium Carbonicum) : हृदयाच्या ठिकाणी वेदना होणे
३. मासिक पाळी चालू असतांनाच्या तक्रारी
३ अ. ग्रॅफायटीस (Graphites)
३ अ १. मासिक पाळी चालू असतांना आवाज घोगरा होणे आणि सर्दी-ताप येणे
३ अ २. अंग थरथरणे
३ आ. बोरॅक्स (Borax) : मासिक पाळी चालू असतांना दोन्ही मांड्यांच्या सांध्यांच्या मध्ये (groin मध्ये) वेदना होणे (क्रमशः पुढच्या शुक्रवारी)
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील. |