नंजनगूडु (कर्नाटक) येथे ‘दलित संघर्ष समिती’च्या कार्यकर्त्यांनी शिव-पार्वतीच्या मूर्तींवर फेकले पाणी !
अंधकासुराच्या वधाच्या प्रसंगाला विरोध करत कृती केल्याचा दावा
नंजनगूडु (कर्नाटक ) – येथे प्रतिवर्षी देवी पार्वती आणि भगवान शिव यांनी अंधकासुर राक्षसाचा वध केल्याचा प्रसंग साजरा करण्याची प्रथा आहे. यावर्षीही हा उत्सव साजरा करण्यात येत होता. या वेळी याला विरोध करणार्यांनी पार्वती आणि शिव यांच्या मूर्तींवर पाणी फेकले आणि मूर्तींची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी ‘दलित संघर्ष समिती’ च्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
१. कर्नाटकातील म्हैसुरूमधील नंजनगुडू येथे भगवान कंठेश्वराचे मंदिर आहे. कंठेश्वर किंवा नंजुंदेश्वर हे भगवान शिवाचे एक रूप मानले जाते. कन्नडमध्ये नंजू म्हणजे विष पिणे.
२. या मंदिरात प्रतिवर्षी ‘अंधकासुर वध’ साजरा करण्याची परंपरा आहे. या वेळी भगवंताने राक्षसाचा वध केल्याचा प्रसंग दाखवला जातो; मात्र या वेळी या परंपरेवरून गदारोळ झाला.
३. ही परंपरा बंद करण्याची मागणी ‘दलित संघर्ष समिती’ नावाच्या संघटनेने केली. ‘अंधकासुर/महिषासुर आमचा राजा होता. त्यामुळे या प्रथेमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात’, असा दावा या समितीने केला आहे.
संपादकीय भूमिकाराक्षसांचे उदात्तीकरण आणि देवतांची विटंबना करणार्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते ! |