Hindu Hater Teacher : मेरठ (उत्तरप्रदेश) येथे खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना कपाळावरील टिळा पुसण्यास भाग पाडले !

बजरंग दलाच्या विरोधानंतर मुख्याध्यापिकेकडून क्षमायाचना !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील कदम पब्लिक स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळा पुसल्याच्या प्रकरणी बजरंग दलाने जाब विचारल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिकेने क्षमा मागितली.

अ. २३ डिसेंबर या दिवशी काही विद्यार्थी कपाळावर टिळा लावून शाळेत गेले होते. त्या वेळी शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी त्यांना टिळा पुसून येण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी नकार दिल्यावर शिक्षकांनी त्यांना धमकी दिली आणि विद्यार्थ्यांना टिळा पुसण्यास भाग पाडले. विद्यार्थ्यांनी घरी येऊन पालकांना ही घटना सांगितली. त्यांनी बजरंग दलाचे प्रांत विद्यार्थी प्रमुख अभिषेक चौहान यांना दिली. यानंतर चौहान यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला घेराव घातला आणि जाब विचारला. त्यांना मुख्याध्यापिका पारुल चौधरी यांनी क्षमा मागितली.

आ. याविषयी शाळेचे व्यवस्थापक संजीव चौधरी यांनी म्हटले की, टिळा पुसण्यासारखी कोणतीच घटना झाली नाही. विद्यार्थिनींना शाळेत लिपस्टिक आणि कुंकू घेऊन आणण्यास बंदी घातली होती; कारण त्यांच्या दप्तरांमध्ये या गोष्टी आढळल्या होत्या. या विद्यार्थिनींनी घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळा पुसल्याची चुकीची माहिती दिली.

संपादकीय भूमिका

हिंदु शिक्षक असणार्‍या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहेच, तसेच हिंदु अन्य धर्मियांच्या तुलनेत धमनिरपेक्ष असल्याचे दाखवतात आणि हिंदुद्रोह करतात, हेही तितकेच सत्य आहे !