Denigration Of Deity : केक कापतांना त्यावर दारू ओतून ‘जय माता दी’ म्हणणारे अभिनेते रणबीर कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
मुंबई – नाताळानिमित्त ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर हातात सुरी घेऊन केप कापत होता. त्याच वेळी तेथे उपस्थित असलेले अभिनेते रणबीर रणबीर कपूर यांनी केकवर दारू ओतली आणि त्याला आग लावली अन् ‘जय माता दी’ असे म्हटले. अशा प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीय यांच्याविरुद्ध संजय तिवारी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
सौजन्य : न्यूज ड्रम
संपादकीय भूमिका
|