Camels Smuggling : ४९ उंटांची धुळे येथून विदर्भात अवैध वाहतूक करणारे दोघे कह्यात !
२ जण कह्यात
धुळे – गुजरातमधील कच्छ येथून आणलेल्या उंटांची धुळे येथून विदर्भातील गोंदिया येथे अवैध वाहतूक करण्यात येत होती. या वेळी पोलिसांनी ४९ उंटांसह २ जणांना कह्यात घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. भोजाभाई रबारी (वय २२ वर्षे) आणि बाराभाई मंगुभाई रबारी (वय ६० वर्षे) अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. उंटांची वाहतूक होत असल्याविषयी काही गोरक्षकांनी पोलिसांना कळवले होते. (जे गोरक्षकांना समजते, ते पोलिसांना आधीच का समजत नाही ? – संपादक)
उंटांच्या वैद्यकीय तपासणीत काही उंट आजारी असल्याचे समोर आले. असे असतांना त्यांना इतक्या लांबपर्यंत नेणे, हे त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखेच आहे. या वरील दोघांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.