प्रभु श्रीराम कलशाचे पनवेल येथील सनातन आश्रमाजवळील शिवमंदिरात पूजन !
पनवेल, २७ डिसेंबर (वार्ता.) – प्रभु श्रीराम कलशाचे सनातनच्या देवद आश्रमाजवळील शिवमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता आगमन झाले. कलशाचे पूजन ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे श्री. अविनाश गिरकर यांनी केले. त्यानंतर कलश शिवमंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. पूजनाच्या वेळी रामभक्त ‘जय श्रीराम’ घोषणा देत होते. दर्शनानंतर कलश पाली-देवद मार्गे आकुर्लीकडे भक्तांना दर्शनासाठी नेण्यात आला. पुढे ‘संघ कार्यालयात कलश ठेवून पनवेल तालुक्यात अक्षतांचे वाटप होईल’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दत्तात्रेय धोंडे यांनी सांगितले.