काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन : प्रबोधन, जागृती आणि साहाय्य !
१. नमाज पढण्यासाठी जागा बळकावून मशीद अस्तित्वात आणणे
आम्ही एका वर्षी हरमुख यात्रेत गेल्यावर तेथे दगडाने सिद्ध केलेले ठिकाण पाहिले. त्यावर ‘हिरा मशीद’ असे लिहिले होते. तेथील लोकांना याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही यावर काय करू शकतो ? आम्हाला नमाज पढण्यासाठी जागा हवी होती ना ? आम्ही पर्यटकांसमवेत येथे येतो; म्हणून आम्ही २ दगड उभारून इकडे नमाज पढत आहोत.’’ ५० वर्षांनंतर या ठिकाणाविषयी असे मानले जाईल की, येथे कुणीतरी मुतवल्ली (मशिदीचा व्यवस्थापक) होता आणि तो काहीतरी करत होता. त्यामुळे हे ठिकाण असे झाले, जशी बाबरी मशीद झाली !
२. आतंकवादाच्या वाढत्या शिरकावामुळे जागरूकता आवश्यक !
वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंनी केलेल्या पलायनाविषयी संपूर्ण देशाला सांगण्यात आले; पण महाराष्ट्रातील लोकांनी ते मान्य केले नाही. त्यानंतर पुणे येथे बाँबस्फोट झाला. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या घटनेमुळे अर्धी मुंबई आतंकवाद्यांच्या कह्यात गेलीच होती. ‘आता हे देशात सर्वत्र पसरत आहे’, असे सर्वांना वाटू लागले. यासाठी जागरूकतेची आवश्यकता आहे.
३. हिंदूंना काश्मीरमध्ये यात्रा करण्यास बंदी असणे हा धर्मद्वेषच !
आम्ही कधी हजयात्रा रोखण्यास सांगितली नाही. पाकिस्तानातील सगळे धनवान तेथे जातात. तेथे दुसर्या यात्राही असतात आणि देवीची यात्राही असते. देशभरातील लोक कंबोडिया आणि इंडोनेशिया येथेही जातात. तेथे जाण्यास सर्वांना अनुमती आहे; पण हिंदूंना काश्मीरमध्ये यात्रा करण्यास बंदी आहे. यामध्ये धर्मद्वेषाचा पुष्कळ मोठा वाटा आहे.
दुसरा भाग धर्मांतराचा आहे. येथे लोकांना बलपूर्वक धर्मांतरित केले जाते. धर्मांतर झालेल्यांच्या मनात अपराधीपणाची भावना असते. त्यांना वाटते, ‘मी कसा धर्मांतरित झालो ? अन्य लोक त्यापासून कसे काय वाचले ?’ हेच अपराधीपण आजही काश्मीरच्या लोकांना सतावत आहे. तेथे ९९ टक्के हिंदूच होते. ते आता हे अपराधीपण सहन करू शकत नाहीत.
४. बहुसंख्यांकांवर अन्याय का ?
धर्मांतर हे सर्वांत धोकादायक असते. जर सरकारला दृढनिश्चयाने मुसलमानांसाठी काही करायचे असेल, तर करावे. आमचा त्याविषयी काही आक्षेप नाही; पण हिंदूंना वेगळी वागणूक का ? आम्ही बहुसंख्यांक समुदायाचे आहोत. तुम्ही अल्पसंख्यांकांपासून बहुसंख्यांकांना खड्ड्यात का घालत आहात ?
५. भारतात हिंदूंना अधिकारांसाठी लढावे लागणे खेदजनक !
काश्मिरी पंडितांना दुसर्या जातींसमवेत तोलू नका. आज ‘तुम्ही कायस्थ आहात, मराठा आहात किंवा ओबीसी आहात’, असे सांगून हिंदूंमध्ये फूट पाडली जात आहे. जेव्हा ८० कोटी हिंदूंचा आवाज एकमुखी घुमेल, तेव्हा तो आवाज ऐकण्याव्यतिरिक्त कुणापुढेही अन्य पर्याय नसेल आणि त्याला कुणीही विरोधही करू शकणार नाही. शेवटी हा भारत आहे. येथे आम्ही आमचे अधिकार मागत आहोत. त्यासाठी आम्हाला लढावे लागत आहे, याचेच दुःख आहे. जेव्हा गाझा येथे बाँब टाकले जातात, तेव्हा भारतीय मुसलमान आंदोलन करतात. काश्मिरी हिंदूंवर एवढे अत्याचार होत असतांना आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रयत्न होत असतांना अन्य भारतियांकडून तुम्ही कोणत्या अपेक्षा करता ?
६. काश्मीर आणि मातृभूमी यांच्या उभारणीसाठी काश्मिरी हिंदु कार्य करणार असून देशवासीय त्याच्यासमवेत असतील !
इंग्रजीत ‘Charity begins at home’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही स्वतःशी लढणार नाही, तोपर्यंत काही होत नाही. काश्मीरमधून हिंदूंचे झालेले पलायन, त्यांनी सहन केलेल्या वेदना, काश्मिरी हिंदूंची झालेली दुर्दशा यांविषयी समविचारी संघटनांसमवेत मिळून ते संपूर्ण भारतात दाखवले जावे. काश्मिरी हिंदूंचे वास्तव दाखवणारे ‘फॅक्ट’चे प्रदर्शन लावले जावे. आम्ही हिंदु जनजागृती समितीसमवेत काम करत आहोत. अनेक संघटना काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात काय झाले, ते सांगण्याचा प्रयत्न करतात.
काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन प्रथम व्हायला हवे. त्यानंतर तुम्हाला अखंड भारताचे स्वप्न पहायचे असेल, तर पहा; पण आधी तेथील हिंदूंना तेथे पाठवा; कारण त्यांची मुळे तेथेच आहेत. जो काही निर्णय होईल, तो ठाम असायला हवा. यामुळे आमची पुढची पिढी आमच्यावर त्यांचे भविष्य सुरक्षित न ठेवल्याचा आरोप करणार नाही. आम्ही काश्मिरी मातृभूमीविषयी बोलतो. प्रत्येक काश्मिरी आणि काश्मिरी युवक मातृभूमी बनवण्यासाठी तत्पर आहे. काश्मीरमधील बहुसंख्यांक समुदाय म्हणतो की, जे काश्मीरमधून बाहेर पडले आहेत, ते आता स्थिर झाले आहेत. त्यांना काश्मीरमध्ये परत यायचे नाही; पण ते हेतूपुरस्सर ही आग वाढवत आहेत.
काश्मीरचा प्रत्येक हिंदू आणि युवक तेथे जाऊन पुन्हा स्वतःची मुळे घट्ट करू इच्छितो. काश्मीर किंवा आपल्या मातृभूमीच्या उभारणीसाठी तो काम अन् सहकार्य करील. सगळे देशवासीय त्याच्यासमवेत असतील. अशाच प्रकारे सर्व आघाड्यांवर काम होत आहे. प्रत्येक माणूस आम्हाला पाठिंबा देत आहे आणि तो आम्ही योग्य मार्गावर असल्याचे सांगत आहे. हा वेगळ्या प्रकारचा पालट आहे. त्यातून आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे.
७. भारताला विळखा घालणारा जिहाद आणि इस्लामीकरण यांच्या लाटेविरोधात जागृतीची सुनामी उभी करणे आवश्यक !
वर्ष १९९० मध्ये जेव्हा कािश्मरी हिंदूंचे पलायन झाले, तेव्हा आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आमची व्यथा सांगत होतो. तेव्हा लोकांना वाटले की, आम्ही घाबरलो आहोत; म्हणून असे सांगत आहोत; पण आज जेव्हा हे सगळीकडेच होऊ लागले, तेव्हा त्यांना त्यातून शिकायला मिळाले. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश येथेही बाँबस्फोट झाले. ही जिहाद आणि इस्लामीकरण यांची लाट आहे. ती संपूर्ण भारताला विळखा घालत आहे. तिला तेथेच रोखावे लागेल. त्यासाठी जागृतीची सुनामी उभी करावी लागेल. ही सुनामी या जिहादच्या लाटेला तेथेच अडवून मागे ढकलेल.
८. ‘पनून कश्मीर’ (स्वतःचे काश्मीर) उभारण्यासाठी साहाय्य करा !
आम्ही काश्मीरमधून बाहेर पडून महाराष्ट्रात आलो; पण आता जर येथूनही बाहेर पडावे लागले, तर आम्ही जायचे कुठे ? जगात कोणत्याही हिंदूवर अत्याचार झाला, तर आम्ही एकत्र येऊन त्याला विरोध केला पाहिजे आणि हिंदूंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी देशवासियांकडून हीच अपेक्षा आहे की, आमच्यावर अत्याचार झाले आहेत; म्हणून तुम्ही आमच्यासमवेत या आणि ‘पनून कश्मीर’ उभारण्यासाठी आम्हाला साहाय्य करा. काश्मीरमध्ये हिंदूंचे परतणे, म्हणजे तेथे भारताचे पुन्हा परतणे आहे. यासाठी ‘पनून कश्मीर’ अत्यावश्यक असून यासाठी भारतातील सर्व लोकांचे सहकार्य हवे. संपूर्ण हिंदु समाज आमच्यासमवेत उभा राहिला, तर काश्मिरी हिंदू पुन्हा आपल्या काश्मीरमध्ये परततील आणि तेथे त्यांचे पुनर्वसन होईल, हे निश्चित !
– श्री. राहुल कौल, अध्यक्ष, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’, पुणे.