Indian overseas congress : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्र हवे कि धर्मनिरपेक्ष स्थिर देश हवा ?, हे जनतेला ठरवावे लागेल !’ – सॅम पित्रोदा
काँग्रेसची विदेशातील शाखा असलेल्या ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचे हिंदुद्वेषी विधान !
नवी देहली – वर्ष २०२४ च्या निवडणुका भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतियांना हिंदु राष्ट्र हव आहे कि सर्वसमावेशी आणि स्थिर धर्मनिरपेक्ष देश हवा आहे ? हे ठरवावे लागेल, असे विधान काँग्रेसची विदेशातील शाखा ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.
(सौजन्य : ANI News)
मुलाखतीत सॅम पित्रोदा यांनी मांडलेली सूत्रे
१. काँग्रेसला भगवान श्रीरामांमुळे अडचण होती. (त्यामुळेच हिंदूंनाही काँग्रेसची अडचण वाटू लागल्याने हिंदूंनी तिला सत्ताच्युत केले, हे सॅम पित्रोदा यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक) आता देशात श्रीरामाचे उघडपणे समर्थन केले जात आहे.
२. मला कोणत्याही धर्माविषयी अडचण नाही. कधी कधी मंदिरात जाणे योग्य आहे; मात्र तुम्ही त्याला मुख्य मंच बनवू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने मंदिरात जाणेही योग्य नाही. (कुणी काय करावे आणि काय करू नये ? हे सांगणारे काँग्रेसवाले कोण ? हा पंतप्रधानांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला नाही का ? – संपादक)
People should decide if they want a #HinduRashtra or a truly secular nation – Chairman of Indian Overseas Congress, Sam Pitroda
👉 Hindus are well versed with the fact that 75 years of secularism has only hindered India, in every aspect. Hindus thus demand Hindu Rashtra to… pic.twitter.com/lGgDR0loQN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 27, 2023
३. देशात श्रीराममंदिर मुख्य सूत्र आहे कि बेरोजगारी, महागाई, वायूप्रदूषण ? हे जनतेने ठरवले पाहिजे. (काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीत श्रीराममंदिर बांधणे तर सोडूनच द्या; पण बेरोजगारी, महागाई आणि वायूप्रदूषण सर्वाधिक प्रमाणात वाढले, याची सॅम पित्रोदा यांना कुणीतरी आठवण करून द्यायला हवी ! – संपादक)
४. लोकांना हे ठरवावे लागेल की, त्यांना हुकूमशाह हवा आहे कि लोकसेवक ? धर्माच्या आधारे फाळणी हवी आहे कि सर्वांना समवेत घेऊन जाणारा लोकसेवक हवा आहे ? लोकांमध्ये भीती निर्माण करणारे सरकार हवे आहे कि संरक्षण करणारे सरकार हवे आहे ? (काही जरी असले, तरी लोकांनी ‘आता काँग्रेस मात्र नको’, हे निश्चितपणे ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी कितीही आटापिटा केला, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही ! – संपादक)
५. वर्ष २०२४ मध्ये होणार्या निवडणुका एखाद्या व्यक्तीच्या भविष्यासाठी नाही, तर देशाच्या भविष्यासाठी होणार आहेत.