UP Love Jihad : ‘आज मी मुसलमान बनलो’, असे सांगणार्या एका हिंदु युवकाचा व्हिडिओ प्रसारित !
|
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील आकाश मौर्य नावाच्या २४ वर्षीय हिंदु युवकाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात त्याने इस्लामी टोपी परिधान केली आहे. व्हिडिओत ‘मेरा दिल तो महंमद’ नावाचे गीत ऐकवले जात आहे, तसेच खाली ‘आज मैं मुसलमान बन गया हूं ।’, असे लिहिले आहे. हा व्हिडिओ समोर येताच आकाशची पत्नी लक्ष्मी हिने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे आणि शबाना खान नावाच्या एका मुसलमान युवतीने आकाशला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे बळजोरीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे.
“Shabana Khan trapped my husband Akash Maurya in love and converted him to Islam”, alleges wife.@bareillypolicepic.twitter.com/OQVuYepIQO
— Treeni (@_treeni) December 25, 2023
लक्ष्मीने सांगितले की, २१ डिसेंबरपासून तिचा पती घरी परतला नाही. घरातून जातांना त्याने सोने आणि चांदी यांची काही नाणी अन् रोख २३ सहस्र रुपये नेले. आकाश हा एका कुरियर आस्थापनात ‘डिलिव्हरी बॉय’चे काम करतो. लक्ष्मीने पुढे सांगितले की, आकाशची शबानाशी ४ महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर ती त्याला संपर्क करू लागली आणि त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एके दिवशी शबानाने लक्ष्मीला ‘व्हिडिओ कॉल’ करून धमकावले की, आकाशने इस्लाम स्वीकारला आहे. जर आकाशला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तर लक्ष्मीला इजा पोचवण्यात येईल. या वेळी आकाश रडत असल्याचे दिसत होता. २६ डिसेंबर या दिवशी आकाशच्या वडिलांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, धर्मांतराचे आरोप बरोबर आहेत. आकाश आता घरी परतला आहे.
संपादकीय भूमिका
|