Taliban Pakistan Relation : अफगाणिस्तान कुणाच्याही धमक्यांपुढे झुकत नाही ! – तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
इस्लामाबाद – तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही आतंकवादी संघटना पाकिस्तानी शहरांमध्ये सातत्याने आतंकवादी कारवाया करत आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये बर्याच दिवसांपासून तणाव आहे. ‘टीटीपी’ला अफगाणिस्तानात आश्रय मिळत असून अफगाण सरकारने त्यावर बंदी घालावी’, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तालिबानच्या परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी पाकिस्तानच्या चेतावणीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘अफगाणी जनता रशिया आणि अमेरिका यांच्यासमोर झुकली नाही. त्यामुळे इतर कोणाच्याही धमक्यांपुढे झुकण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही’, असे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी अधिकारी आणि टीटीपी नेतृत्व यांच्यात झालेल्या अनेक बैठकांनंतर बहुतांश समस्यांचे निराकरण करण्यात आले होते, असे मुत्ताकी यांचे म्हणणे आहे. तालिबानने मध्यस्थी केल्याने दोन्ही बाजू करार करण्याच्या जवळ आल्या होत्या; परंतु पाकिस्तानने चर्चेतून माघार घेतल्याने निर्णय होऊ शकला नाही. पाकिस्तानने यापूर्वी ‘टीटीपी’ ने माघार घेतल्याचा आरोप केला होता.