CPI(M) Unwanted Advice : धर्म हा वैयक्तिक विषय असल्याने त्याचा वापर राजकीय लाभासाठी न करण्याचा माकपचा फुकाचा सल्ला !
माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांचा श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाण्यास नकार !
नवी देहली – धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे, ज्याचा वापर राजकीय लाभासाठी केला जाऊ नये, असे विधान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले आहे. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांना अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते; मात्र त्यांनी या सोहळ्याला उपस्थित रहाण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर माकपकडून सामाजिक माध्यमातून एक पोस्ट प्रसारित केली आहे.
#WATCH | On Pran Pratishtha of the Ram Temple in Ayodhya, CPI (M) General Secretary Sitaram Yechury says, “I’ve not told anybody anything so far. Nripendra Mishra was escorted by a VHP leader who came and gave me the invitation…Religion is a personal choice of every… pic.twitter.com/tfwkQe5Xsw
— ANI (@ANI) December 26, 2023
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजप आणि रा.स्व. संघ यांनी एका धार्मिक कार्यक्रमाचे सरकारी कार्यक्रमात रूपांतर करणे दुर्दैवी आहे, ज्यामध्ये पंतप्रधान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर सरकारी अधिकारी थेट सहभागी होत आहेत. राज्यघटनेनुसार भारतात राज्यकारभाराला कोणताही धार्मिक संबंध नसावा. सत्ताधारी पक्ष त्याचे उल्लंघन करत आहे.
The CPI(M) policy has been to respect religious beliefs & safeguarding the right of every individual to pursue their belief. Religion is a personal choice not to be converted into an instrument for political gain. This is a State sponsored function in presence of PM & UP CM. pic.twitter.com/A9SKOq1AsG
— Sitaram Yechury (@SitaramYechury) December 26, 2023
संपादकीय भूमिका
|