राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचालक पद ५ वर्षांपासून रिक्त !
मुंबई – गेल्या पाच वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण संचालनालयात गेल्या ५ वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय शिक्षण संचालक पदावर कुणीही कार्यरत नाही. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगरे हे वर्ष २०१९ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर या पदावर कुणाचीही नेमणूक झालेली नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचा कारभार हंगामी तत्त्वावर चालू आहे.
संपादकीय भूमिकाराज्यात शासकीय महाविद्यालये चालू करण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत ! |