जपानच्या कोयासन विद्यापिठाकडून आयोजित पदवीदान समारंभात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्रदान !
मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापिठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. पदवी प्रदान सोहळा मुंबई विद्यापिठातील दीक्षांत सभागृहात २६ डिसेंबर या दिवशी पार पडला. या विद्यापिठाकडून अशी पदवी मिळणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत. कोयासन विद्यापिठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देण्याचा निर्णय घेतला.