सातारा जिल्ह्यातील शिधा वाटप दुकाने १ जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी बंद !
सातारा, २६ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिधा वाटप दुकानदार १ जानेवारी २०२४ पासून आपली दुकाने अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार आहेत, अशी माहिती रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे, रेशमी धान्य वाटपाचे कमिशन सध्याच्या महागाईनुसार वाढवून मिळावे किंवा शिधा वाटप दुकानदारांना प्रतिमास ठराविक मानधन मिळावे. दुकानदारांना दिलेल्या ‘थम्ब इंप्रेशन’ यंत्रे जुनी झाल्यामुळे ती वारंवार बंद पडत आहेत. ती पालटून द्यावीत. यंत्राला २ जीबीचे नेटवर्क आहे. त्यामुळे पावत्यांसाठी वेळ लागत असतो. दुकानदारांना ५ जीबीचे नेटवर्क देण्यात यावे. सर्वरच्या समस्या दूर करण्यात याव्यात. यांसह अनेक मागण्यांची शासनाने नोंद न घेतल्याने ‘ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन’ने हा बंद पुकारला आहे. यात सातार्यातील १ सहस्र ७०७ दुकानदार सहभागी होतील.
संपादकीय भूमिकाअसे बंद पाळण्याची वेळ का येते ? यामुळे होणार्या जनतेच्या गैरसोयीचे दायित्व कुणाचे ? |