पवित्र अयोध्येला मद्य-मांसमुक्त करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ पार पडले !
वाराणसी – आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे. याप्रमाणेच हिंदूंसाठी परमपवित्र असलेल्या अयोध्येला संपूर्ण मद्य-मांसमुक्त करण्यात यावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली. येथील शास्त्रीघाट येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त वरील मागणी करण्यात आली. आंदोलन झाल्यानंतर उपस्थितांनी पोलीस अधिकार्यांना उत्तरप्रदेश मुख्मंत्र्यांच्या नावे निवेदन सोपवले. याप्रसंगी वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा, पहाडिया व्यापारी मंडळाचे श्री. अरविंद लाल, हिंद मजदूर किसान समितीचे श्री. राजेश कुमार, राष्ट्रीय बजरंग दल, काशी महानगरचे महामंत्री श्री. हरिनाथ सिंह आणि वाराणसी व्यापारी मंडळाचे संघटनमंत्री श्री. सुनील कुमार गुप्ता, अनुप कुमार, जया केशरी, सत्येंद्र सिंह, कविंद्र जायसवाल, एस्.एम्. वहल, व्यापारी मंडळाचे सुनील चौरसिया, राज बहादुर गुप्ता, अधिवक्त्या अनुष्का तिवारी, तसेच समितीचे सर्वश्री विश्वनाथ कुलकर्णी, राजन केशरी आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.