Converted Triabals No Reservation : ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्या आदिवासींना आरक्षण देऊ नका !
|
रांची (झारखंड) : धर्मांतर करणार्या आदिवासींची नावे अनुसूचित जमातीच्या सूचीतून वगळावीत, तसेच त्यांना आरक्षणही मिळू नये, या मागणीसाठी देशभरातून सहस्रावधी आदिवासी हिंदू देहलीत एकत्र येणार आहेत. २४ डिसेंबर या दिवशी रांचीमध्ये जवळपास ५ सहस्र आदिवासींनी एकत्र येत हीच मागणी केली. ‘आदिवासी सुरक्षा मंच’ नावाची संघटना देशभरातील सर्व हिंदु आदिवासींना एका व्यासपिठावर आणण्याचे काम करत आहे.
‘आदिवासी सुरक्षा मंच’च्या नेत्यांनी म्हटले की,
१. ख्रिस्ती धर्मात गेलेल्या आदिवासींना चर्च आणि मिशनरी यांच्याकडून अर्थसाहाय्य मिळत आहे. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळत आहेत. ज्या आदिवासींनी स्वतःचा मूळ धर्म पालटला नाही, त्यांच्या तुलनेत ते अधिक सक्षम स्थितीत आहेत.
२. धर्मांतरितांना चर्चच्या माध्यमातून परदेशातून पैसा मिळत आहे. त्यांना आरक्षणाचा लाभही मिळत असून सरकारकडून अल्पसंख्यांकांसाठी चालवल्या जाणार्या योजनांचाही ते लाभ घेत आहेत. हा विरोधाभास असून नियमाविरुद्ध आहे.
(सौजन्य : News11 Bharat Digital)
धर्मांतरित आदिवासींचे प्रमाण २० टक्के; परंतु आरक्षणातून मिळालेल्या सरकारी नोकरीत त्यांचे प्रमाण ९० टक्के ! – लोकसभेचे माजी उपसभापतीरांचीमध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा म्हणाले, ‘‘धर्मांतर करणार्या आदिवासींची संख्या १५ ते २० टक्के आहे. असे असले, तरी सरकारी नोकर्या आणि प्रथम श्रेणी (क्लास वन) अधिकार्यांचा विचार करता, त्यांची भागीदारी एकूण आदिवासींच्या तुलनेत ९० टक्क्यांपर्यंत आहे.’’ |