पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) अहंशून्यता, भाव अन् भक्ती यांचे मूर्तीमंत रूप असती ।
‘२६.१२.२०२३ (दत्तजयंती) या दिवशी सनातनचे २६ वे (समष्टी) संत पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) यांचा ८३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी पू. भाऊकाकांच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प येथे दिले आहे.
पू. भाऊकाकारूपी चैतन्याची भावगंगा असे हो देवद आश्रमी ।
त्यांच्यातील भावसुगंधाने साधकरूपी फुले बहरती सनातनच्या नंदनवनी ।। १ ।।
पू. भाऊकाका सदैव अंतर्मुख राहून गुरुदेवांच्या (टीप १) अनुसंधानात असती ।
त्यांच्या चैतन्यमय अस्तित्वाने साधक परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवा करती ।। २ ।।
पू. भाऊकाका उच्च भावावस्थेचे मूर्तीमंत रूप असती ।
त्यांच्या चेहर्यावरून उत्साह अन् आनंद ओसंडून वहाती ।। ३ ।।
पू. भाऊकाका साधकांना स्वभावदोषांसह स्वीकारून प्रेमाने घडवती ।
ते स्वतःच्या आचरणातून साधकांना साधना शिकवती ।। ४ ।।
पू. भाऊकाका अहंशून्यता, भाव अन् भक्ती यांचे मूर्तीमंत रूप असती ।
ते तळमळ, भाव, भक्ती अन् श्रद्धा ठेवूनी निरंतर साधना करती ।। ५ ।।
पू. भाऊकाका शिस्त आणि नियम पाळून गुर्वाज्ञापालन करती ।
ते वयस्कर असूनही तरुणांना लाजवेल, अशी गुरुसेवा करती ।। ६ ।।
पू. भाऊकाका सनातनच्या संत मांदियाळीतील अनमोल रत्न शोभती ।
कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो पू. भाऊकाकांच्या कोमल चरणी ।। ७ ।।
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |