Hindu Hater : (म्हणे) ‘हिंदु धर्म एक धोका आहे !’ – स्वामी प्रसाद मौर्य
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुन्हा एकदा संतापजनक विधान !
नवी देहली – हिंदु धर्म एक धोका आहे. वर्ष १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, ‘हिंदु नावाचा कोणताही धर्म नाही. ही एक जीवन जगण्याची कला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही २ वेळा म्हटले, ‘हिंदु नावाचा कोणताही धर्म नाही, तर जगण्याची एक कला आहे.’ पंतप्रधान मोदी यांनीही म्हटले आहे, ‘हिंदु कोणताही धर्म नाही.’ हे लोक अशा प्रकारची विधाने देतात, तेव्हा कुणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत; मात्र मी जर असे काही विधान केले, तर संपूर्ण देशात भूकंप येतो, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. मौर्य यांनी यापूर्वी श्रीरामचरितमानस, श्री लक्ष्मीदेवी, हिंदु राष्ट्र आदींविषयी आक्षेपार्ह विधाने केली आहेत; मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
#WATCH दिल्ली: समाजवादी पार्टी के नेता स्वामी प्रसाद मौर्य का कहना है, ”… हिंदू एक धोखा है… वेसै भी 1995 में सुप्रीम कोर्ट ने कहा था कि हिंदू कोई धर्म नहीं है, यह जीवन जीने की एक शैली है। RSS प्रमुख मोहन भागवत ने भी दो बार कहा है कि चुके हैं कि हिंदू नाम का कोई धर्म नहीं है,… pic.twitter.com/7nVsBK56jL
— ANI_HindiNews (@AHindinews) December 26, 2023
संपादकीय भूमिका
|