पुराव्याअभावी मुसलमान तरुणाची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे प्रकरण

सुरत (गुजरात) – हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर तिच्याशी विवाह केल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने महंमद अख्तर शेख या तरुणाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. शेख याने स्वतःचे नाव मुकेश गुप्ता असे सांगितले होते. विवाहानंतर त्याने पीडित तरुणीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याला वर्ष २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. शेख विवाहित असतांनाही त्याने या तरुणीशी विवाह केला होता.