अपघातात जप्त केलेले वाहन परत देण्यासाठी लाच घेणार्या मंचरमधील साहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक !
पुणे : अपघात प्रकरणात जप्त केलेले वाहन परत करण्यासाठी एकाकडे ४० सहस्र रुपयांची लाच मागण्यात आली. लाच मागणारे पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंके यांच्यासह शिपाई संदीप रावते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एका तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार साळुंके आणि रावते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (लाच घेणारे पोलीस खात्यात असणे हे लज्जास्पद ! भ्रष्ट पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ? – संपादक)