गृहनिर्माण संस्थेत आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्या गृहस्थांना अटक !
मुंबई – गोराई गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत आतंकवादी घुसल्याची बतावणी ५८ वर्षीय अध्यक्ष भूषण नारायण पालकर यांनी केली. याची माहिती मिळताच २५ डिसेंबरला सकाळी मोठ्या संख्येने पोलिसांची पथके घटनास्थळी आली. वसाहतीला चारही बाजूंनी पूर्णपणे वेढा घातला, तसेच सार्वजनिक प्रवेश बंदी केली. तिथे २ मासांपासून रहात असलेले भाडेकरू आणि दुकान चालवत असलेले मदन प्रजापती अन् त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर सोसायटीचे अध्यक्ष आणि एअर इंडियामध्ये ऑपरेशन मॅनेजर असणारे भूषण नारायण पालकर यांना बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना संबंधित घर खरेदी करायचे असल्याने त्यांनी पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे लक्षात आले.