श्री दत्ताची शस्त्रे !
सर्वान् प्रकृतिविकारान् अवधुनोतीत्यवधूतः ।’
अर्थ : सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकतो, नष्ट करतो, तो अवधूत होय), अशी त्याची ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’नुसार (६.१) व्याख्या आहे. सर्व प्रकृतीविकार म्हणजे सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण. दत्त त्यांना धुऊन टाकतो, म्हणजेच निर्गुणाची अनुभूती देतो.
दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या प्रत्येक हातातील वस्तूंविषयी पाहूया.
१. अर्थ
‘ईश्वराच्या निर्गुण लहरींना सामावून घेणारे, तसेच वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी संपूर्ण त्रैलोक्याला एकाच वेळी एका क्षणात मंडल काढण्याची क्षमता असलेले जल ज्या कुंडात सामावलेले आहे, ते कुंड म्हणजे दत्ताच्या हातातील कमंडलू.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावानेही भाष्य करतात.)
२. वैशिष्ट्य
‘दत्ताच्या हातातील कमंडलूतील जल हे सर्वांत पवित्र असते.’
– कु. मधुरा भोसले
३. कशाचे प्रतीक ?
कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हा एकप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे; कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय. ‘दत्ताच्या हातात असलेला कमंडलू हा निर्गुणरूपी सुप्त मारक चैतन्याचे प्रतीक आहे
४. दिशेनुसार कमंडलूचे कार्य
कमंडलू ज्या ज्या दिशेकडे कलतो, त्या त्या दिशेकडील वाईट शक्तींचा नाश : दत्ताच्या हातातील कमंडलू हा आवश्यकतेनुसार वाईट शक्तींच्या निर्दालनासाठी कलत्या अवस्थेत दाही दिशांना भ्रमण करून त्या त्या ठिकाणी निर्गुणरूपी मारक चैतन्याचा प्रवाही स्रोत प्रक्षेपित करतो. विनाशकालात कमंडलू पूर्णतः पाताळाच्या दिशेने उलटा होऊन पाताळांतील सर्व प्रकारच्या वाईट शक्तींचा संहार करून शिवाच्या लयशक्तीला साहाय्य करतो. कमंडलूची आकाशाच्या दिशेने असलेली स्थिर स्थिती ही ब्रह्मांडाची संतुलन अवस्था दर्शवते.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावानेही भाष्य करतात.)
त्रिशूळ
त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)
|