Karnataka Hijab Ban : सिद्धरामय्या एका जातीचे नव्हे, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री !
हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !
बेळगाव – सिद्धरामय्या हे कोणत्याही एका जाती-जमातीचे मुख्यमंत्री नव्हेत, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हिजाबबंदी उठवण्याविषयीच्या विधानावरून स्वामीजी यांनी वरील टीका केली.
स्वामीजी पुढे म्हणाले की, हे समाजातील एका घटकाला लक्ष्य करणारे असून ‘एकाला एक न्याय, तर दुसर्याला दुसरा न्याय’, असे आहे. एकाला एक कायदा आणि दुसर्याला दुसरा कायदा, असे करणे योग्य नाही. अशा वागण्याने समाजात गोंधळ निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी परीक्षेला जातांना ‘हिंदु महिलांनी पायातील जोडवी आणि मंगळसूत्र काढले पाहिजे’, असा आदेश आला होता. एकीकडे हे चालले असतांना ‘ठराविक जण बुरखा घालून जाऊ शकतात’, असे सांगितले, असे कुणीही करू नये. मुख्यमंत्र्यांनी असा राज्यकारभार करू नये.