धर्मसेवा म्हणून आपल्या जिल्ह्यातील विद्यमान (हयात) संतांची माहिती कळवा !

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

प्रतिकात्मक चित्र

‘भारतात ठिकठिकाणी संत आहेत. या संतांनी विशिष्ट साधनामार्गांनी साधना करून संतत्व प्राप्त केलेले असते. त्यांच्यामुळे समाजातील अनेक लोक सन्मार्गाला लागलेले असतात. असे संत बर्‍याचदा त्या जिल्ह्यातील किंवा लगतच्या भागातील लोकांनाच ठाऊक असतात. संतांच्या प्रसिद्धीपराङ्मुखतेमुळे ते त्या विशिष्ट भागाच्या बाहेर फारसे परिचित नसतात. ‘अशा संतांची ओळख सर्वांना व्हावी, तसेच त्या संतांची शिकवण आणि चरित्र यांतून जनसामान्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळावी’, या उद्देशांनी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करणार आहोत. यथावकाश सनातनच्या ग्रंथांतही ही माहिती समाविष्ट केली जाईल. ‘संतांची माहिती प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करणे’, ही धर्मसेवाच आहे. साधकांनो आणि वाचकांनो, आपणही या धर्मसेवेचा लाभ घ्यावा. यासाठी अशा संतांविषयी सहजपणे उपलब्ध असलेली माहिती पुढे दिलेल्या ‘ई-मेल’ पत्त्यावर किंवा टपालाने पाठवावी. या माहितीत प्रामुख्याने पुढील सूत्रांचा समावेश असावा.

१. संतांचे नाव, त्यांचा जन्मदिनांक, जन्मतिथी, जन्मस्थळ, जन्मवेळ, सध्या रहात असलेले ठिकाण, वय इत्यादी

२. त्यांचे बालपण, त्यांनी केलेली साधना, त्यांची शिकवण, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांच्या गुरूंची माहिती इत्यादी

३.  त्या संतांविषयीची माहिती विशेषांक, मासिक, पुस्तक आदींच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली असल्यास त्यांची प्रत किंवा छायाप्रत किंवा ‘स्कॅन इमेज’ पाठवावी.

४. ते संत सनातनच्या संपर्कात असल्यास किंवा यापूर्वी ‘सनातन प्रभात’मधून त्यांची माहिती प्रसिद्ध झाली असल्यास तसे कळवावे.

५. त्या संतांची २ – ३ छायाचित्रेही पाठवावीत.

साधकांनी वरील माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी, तर वाचकांनी ही माहिती थेट पाठवावी.

ई-मेल : sankalak.goa@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२३)