काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रहित !
नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण
नागपूर – नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी ५ वर्षे कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रहित करण्यात आले आहे. ते सावनेर येथील आमदार होते. ही अधिसूचना विधीमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आली आहे. ‘कोणत्याही लोकप्रतिनिधीला २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली असेल, तर त्यांचे सदस्यत्व रहित होते’, असा कायदा आहे. त्यानुसार त्यांची आमदारकी रहित करण्यात आली आहे. केदार सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सौजन्य टीव्ही 9