लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून भारताचा झेंडा असलेल्या नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही
नवी देहली – मध्य-पूर्वेतील लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या ‘एम्.व्ही. साईबाबा’ या नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. हे आक्रमण येमेनमधील हुती बंडखोरांनी केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. आक्रमणानंतर या भागात गस्तीवर असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेला आपत्कालीन संंदेश पाठवला होता. या नौकेवर २५ भारतीय कामगार असून तेे सुरक्षित आहेत, असे भारतीय नौदलाने सांगितले आहे. भारताच्या नौकेवर आक्रमण करतांनाच नॉर्वेचा झेंडा असणार्या एका नौकेवरून हुती बंडखोरांनी त्यांचे ड्रोन उडवले; मात्र आक्रमण केले नाही.
सौजन्य द एकॉनॉमिक टाइम्स
संपादकीय भूमिकाभारतीय नौदलाला आव्हान देण्याचा हा हुती बंडखोरांचा प्रयत्न असून यामागे पाकिस्तान आणि चीन यांचा हात असल्याची शक्यता असल्याने भारताने अशांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे ! |