केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांचे निलंबन
नवी देहली – केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर स्थापन झालेली समिती निलंबित केली आहे, तसेच संजय सिंह यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
सौजन्य इंडिया टूडे
संजय सिंह यांनी अध्यक्षपदी निवड होताच नंदिनी नगर, गोंडा येथे १५ आणि २० वर्षांखालील खेळाडूंची स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. यावर क्रीडा मंत्रालयानर म्हटले की, राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करणे घाईचे होते. स्पर्धा घोषित करतांना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही. यातूनच ही समिती निलंबित करण्यात आली.