Karnataka Police Crime : महिला पोलीस शिपायाच्या भ्रमणभाषमधील संपर्कांची माहिती अन्य पोलिसांनी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणार्या चोराला विकली !
|
कलबुर्गी (कर्नाटक) – येथे एका महिला पोलीस शिपायाच्या भ्रमणभाषमधील संपर्कांची माहिती अन्य पोलिसांनी एका चोराला विकल्याची घटना कलबुर्गी जिल्ह्यातील राघवेंद्र पोलीस ठाण्यात घडली. महेश नावाच्या चोराचे या महिला पोलीस शिपायावर एकतर्फी प्रेम होते. तो महिला पोलीस शिपायाला भ्रमणभाष करून मानसिक त्रात देत होता. ‘माझ्यावर प्रेम कर’ अशी तो तिला धमकी देत होता; मात्र ती त्याला नकार देत होती. या महिला शिपायाचा विवाह ठरला होता. महेश याने तिच्या भ्रमणभाषमधील संपर्कांची माहिती मिळाल्यानंतर त्याने ही माहिती तिच्याशी ज्या तरुणाशी विवाह ठरला आहे, त्याला पाठवून दिली. यामुळे त्या तरुणाला महिला पोलीस शिपायाविषयी संशय आल्याने त्याने विवाह मोडला. या संदर्भात महिला शिपायाने पोलीस आयुक्त आर्. चेतन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आता चौकशी करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाचोराला साहाय्य करणार्या पोलिसांना आजन्म कारागृहात टाका ! |