कल्याण येथील महिला अधिवक्त्याच्या मुलाचे अपहरण !
असुरक्षित कल्याण शहर !
ठाणे, २३ डिसेंबर (वार्ता.) – कल्याण येथील आधारवाडी भागात रहात असलेल्या महिला अधिवक्त्या हिमनील महेश पवार यांच्या अल्पवयीन मुलाचे अज्ञातांनी अपहरण केले आहे. कल्याण परिसरात शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून विशेष अन्वेषण पथके सिद्ध करत या प्रकरणाचा शोध चालू केला आहे.