नंदवाळ येथे जाणार्या दिंडीसाठी चांदीचा रथ करण्याच्या कामाचा शुभारंभ !
कोल्हापूर – प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदवाळ येथे प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर प्रमाणेच पायी दिंडी काढण्यात येते, तसेच रिंगण सोहळा होतो. त्यासाठी चांदीचा रथ देण्याचा निर्णय राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी घोषित केला असून याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथे करण्यात आला. या रथासाठी १२० घनफूट सागवान वापरले जाणार असून ६० किलो चांदीने हा रथ सुशोभित करण्यात येणार आहे. या रथासाठी लागणारी ‘ट्रॉली’ ही ‘पॉप्युलर स्टील वर्क्स’च्या श्री. राजेंद्र जाधव यांनी दिली आहे. प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. सुजित चव्हाण, एकमुखी दत्त देवस्थानचे श्री. संतोष गोसावी महाराज, सर्वश्री सागर चव्हाण, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, लाड महाराज, गुरव महाराज, अक्षय पोवार, भगवान तिवले उपस्थित होते.