कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरायमय्या यांनी देहलीला जाण्यासाठी केला खासगी विमानाचा वापर
|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरायमय्या आणि राज्यमंत्री जमीर अहमद खान एका खासगी चार्टड विमानेने नवी देहली येथे गेले होते. राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून आर्थिक साहाय्य मागण्यासाठी ते देहली येथे गेले होते. या प्रवासासाठी सरकारकडून ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. या खर्चावरून भाजपने सिद्धरायमय्या यांच्यावर कठोर टीका केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले, ‘एकीकडे राज्यात दूध, वीज महागली असतांना, दुष्काळ असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री आणि मंत्री खासगी विमानाने प्रवास करत आहेत, त्याचे चित्रीकरण करत आहेत. हे सर्व करदात्यांच्या पैशाने केले जात आहे. हे लज्जास्पद आहे. यातून काँग्रेस कुठेही सत्तेत असली, तर ती जनतेच्या पैशाची उधळपट्टी करते, हे लक्षात येते.’
सौजन्य इंडिया टूडे
भाजपवाल्यांना प्रश्न विचारा ! – मुख्यमंत्री सिद्धरायमय्या
या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरायमय्या यांना पत्रकारांनी विचारणा केल्यावर ते म्हणाले की, हा प्रश्न तुम्ही भाजपवाल्यांना विचारा. पंतप्रधान मोदी कोणत्या विमानाचा वापर करतात ? ते अशा विमानांतून एकटेच प्रवास का करतात ? हे प्रश्न त्यांना थेट विचारा, असे उत्तर दिले.
संपादकीय भूमिकाकाँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे ! |