Khalistani Attack USA Temple : नेवार्क (अमेरिका) येथे खलिस्तान्यांकडून स्वामीनारायण मंदिराची विटंबना !
नेवार्क (अमेरिका) – खलिस्तानी आतंकवाद्यांच्या सूत्रावरून अमेरिका आणि कॅनडा भारतावर आगपाखड करत असतांना आता अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा तेथील मंदिरावर आक्रमण केले आहे. कॅलिफोर्निया राज्यातील नेवार्क शहरातील स्वामीनारायण मंदिराला त्यांनी लक्ष्य केले आहे. अमेरिकेतील ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने ‘एक्स’वरून या आक्रमणाची छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
#Breaking: Swaminarayan Mandir Vasana Sanstha in Newark, California was defaced with pro-#Khalistan slogans.@NewarkCA_Police and @CivilRights have been informed and full investigation will follow.
We are insisting that this should be investigated as a hate crime. pic.twitter.com/QHeEVWrkDj
— Hindu American Foundation (@HinduAmerican) December 22, 2023
या वेळी खलिस्तान्यांनी स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर काही घोषणा लिहिल्या आहेत. पोलिसांकडून याचा तपास चालू आहे. या घटनेला ‘हेट क्राईम’ (द्वेषातून केलेला गुन्हा) मानण्यात यावे. त्याआधारेच तपास करून आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणीही ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने केली आहे.
दोषींवर कारवाई करण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणला आहे ! – भारतखलिस्तान्यांनी मंदिरावर केलेल्या आक्रमणाविषयी सॅन फ्रान्सिस्को येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, आम्ही कॅलिफोर्नियातील नेवार्क येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्याचा तीव्र निषेध करतो. या घटनेमुळे भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही अमेरिकी अधिकार्यांवर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यासाठी आणि तोडफोड करणार्या दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी दबाव आणला आहे.
|
संपादकीय भूमिकाभारताला खलिस्तानी आतंकवाद्यांच्या हत्येमध्ये गोवू पहाणारी अमेरिका आणि कॅनडा यांना आता भारताने जाब विचारला पाहिजे ! |