साकीब नाचण याला सीरियातील व्यक्तीला भेटण्यासाठी पडघा येथे पाठवल्याचे चौकशीतून उघड !
मुंबई – भिवंडीतील पडघा गावातून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेल्या साकीब नाचण याच्या चौकशीतून त्याल सीरियामधील एका व्यक्तीला भेटण्यासाठी पडघा येथे पाठवण्यात आल्याचे उघड झाले. परदेशात लपलेल्या काही आतंकवाद्यांनी त्याच्याकडे हे काम सोपवले होते. येत्या काळात इसिसचे जाळे कसे पसरवायचे ?, तसेच घातपाताच्या कारवाया कशा आणि कुठे करायच्या ?, यांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती. साकीबने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
त्याचे अधिकोषाचे कोणतेही खाते नसून तो जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा. त्यातून त्याला प्रत्येक महिन्याला २ ते ३ लाख रुपये मिळायचे. हे पैसे आतंकवादी कारवायांसाठी वापरले जाणार होते. त्यासाठी लागणारी साधनसामग्री खरेदी करण्यासाठी तो हे पैसे वापरत होता, असेही त्याच्या चौकशीत उघड झाले आहे.
संपादकीय भूमिकाएका आतंकवाद्याला भेटण्यासाठी सीरियातून एक व्यक्ती येते, याची माहिती पोलिसांना किंवा गुप्तचर यंत्रणांना कशी मिळत नाही ? |