यवतमाळ येथे नायब तहसीलदारांवर आक्रमण करणार्या आरोपीला अटक !
बंदूक आणि जिवंत काडतूस जप्त
यवतमाळ – महागाव येथील रेती तस्करीला आळा घालण्यासाठी गेलेले नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणारा सूरज नरवडे (वय २३ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. या वेळी त्याच्याकडून बंदूक आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या आरोपीच्या विरोधात यापूर्वीही दुचाकी चोरी, रेती चोरी, दारूशी संबंधित अनेक गुन्हे नोंदवले आहेत. सूरज परिसरात बंदूक घेऊन दहशत माजवत होता. आक्रमणाच्या प्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने तक्रार केली होती.
संपादकीय भूमिकाअशा उद्दाम आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही ! |