कर्नाटकात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहातील स्नानगृहात कॅमरा बसवणार्या सलीमला अटक !
तीन मुलांचा बाप असलेल्या सलीमला अटक !
कलबुर्गी (कर्नाटक) – येथील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थिनींच्या वसतीगृहातील स्नानगृहात कॅमरा लावण्याचा प्रकार समोर आला आहे. सलीम नावाच्या ३ मुलांच्या वडिलांनी हे कृत्य करून तो ‘वाय-फाय’च्या माध्यमातून विद्यार्थिनींचे त्याच्या भ्रमणभाषवर येत असलेले चित्रीकरण पहात असे. २० डिसेंबरला एका विद्यार्थिनीला हा प्रकार लक्षात आला. तिने आरडोओरडा केल्यावर अन्य विद्यार्थिनीही तिथे जमल्या. वसतीगृहातील अधिकार्यांनी सलीम अलीला वसतीगृहाच्या इमारतीजवळ हिंडत असतांना पकडले. स्थानिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
या वसतीगृहात ५० हून अधिक मुली रहातात. त्या सर्व इयत्ता दहावीत शिकतात. सलीमच्या विरोधात जेवर्गी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्याने विद्यार्थिनींचे बनवलेले व्हिडिओ अन्य कुणाला पाठवले आहेत का ?, याचा पोलीस शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कंबरेपर्यंत भूमीत गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटणार नाही ! |