LPG Price : व्यावसायिक एल्पीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त !

नवी देहली – १९ किलोच्या व्यावसायिक एल्पीजी सिलिंडरची किंमत ३९.५० रुपयांनी अल्प झाली आहे. या कपातीनंतर राजधानी देहलीत १९ किलोच्या व्यावसायिक एल्पीजी सिलिंडरची किंमत १ सहस्र ७५७ रुपये होईल. १ डिसेंबरला व्यावसायिक एल्पीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर २१ रुपयांनी वाढवण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस’ आस्थापनाने अधिक पुरवठा केल्यामुळे एल्पीजीच्या किंमती अल्प झाल्या आहेत.