उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून महंमद अब्दुल अव्वल याला देहलीतून अटक !
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आतंकवादाला अर्थसाहाय्य केल्याच्या एका प्रकरणात उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने २० डिसेंबर या दिवशी महंमद अब्दुल अव्वल याला देहलीतून अटक केली. त्याला येथील निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून पकडण्यात आले. अव्वल हा घुसखोरी आणि आतंकवादाला अर्थसाहाय्य करणार्या गटाचा सदस्य आहे. तो मूळचा आसाममधील गोलपारा येथील रहिवासी असून गेल्या ५ वर्षांपासून देहलीत रहात होता.
अव्वलने अवैध पद्धतीने येथील ‘फीनो बँके’त स्वत:चे खाते उघडले होते. त्याला या खात्यावर एका अशासकीय संस्थेकडून विदेशातून पैसा येत होता. या संस्थेला विदेशी देणगी अधिनियमाच्या अंतर्गत कोट्यवधी रुपये येतात. उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाच्या एका अधिकार्याने १९ डिसेंबर या दिवशी सांगितले की, देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात असलेल्या ५०० हून अधिक ‘संदिग्ध’ बँक खात्यांचे अन्वेषण केले जाणार आहे. हा पैसा समाजहिताची कामे करण्याच्या नावाखाली घुसखोरी, तसेच घुसखोरांना लपवण्यसाठी आणि बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी वापरला जात असल्याचा संशय आहे. या माध्यमातून राष्ट्रविरोधी कारवाया करण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचाही आरोप आहे. या गटातील ५ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात अदिलुर रहमान असरफी, तानिया मंडल आणि इब्राहिम खान, या ३ बांगलादेशी नागरिकांचा, तर बंगाल राज्यातील अबु हुरैरा गाझी आणि शेख नजीबुल हक यांचा समावेश आहे. अब्दुल अव्वल हा यातील अटक झालेला सहावा आरोपी आहे.
अव्वलच्या खात्यात येणारा पैसा तो बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या नावाने चालू करण्यात आलेल्या खात्यांमध्ये जमा करण्याचे काम करत असे.
संपादकीय भूमिकादेशाच्या मुळावर उठलेल्या अशा राष्ट्रद्रोह्यांना आता सरकारने फासावर लटकवण्याची शिक्षा केली पाहिजे ! |