Bhojpali Baba : अयोध्येत श्रीराममंदिर बांधेपर्यंत विवाह न करण्याची ३१ वर्षांपासून शपथ घेतलेले भोजपाली बाबा !
श्रीराममंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी देण्यात आले निमंत्रण !
बैतुल (मध्यप्रदेश) – श्रीराममंदिर बांधल्याखेरीज विवाह न करण्याचा संकल्प करणारे येथील रवींद्र गुप्ता उपाख्य भोजपाली बाबा यांना अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. ते भोपाळचे रहिवासी आहेत. वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढांचा पाडण्याच्या वेळी भोजपाली बाबा अयोध्येत गेले होते. त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी ‘अयोध्येत श्रीराममंदिर बांधल्याखेरीज विवाह करणार नाही’ अशी शपथ घेतली होती. घरच्यांनी त्यांना विवाहासाठी अनेकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी नकार दिला. आज त्यांचे वय ५२ वर्षे आहे. गेल्या ३१ वर्षांपासून सनातन धर्माच्या रक्षणासाठी विविध हिंदु संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. आता भोजपाली बाबांनी विवाह न करता उर्वरित आयुष्य सनातन धर्माला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.